फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून ट्रक रस्त्यात जबरदस्तीने लूटमार करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अंबड लिंक रोड येथे ताब्यात घेतले.येवला टोलनाका येथे दोन सुपारीने भरलेले ट्रक रस्त्यात अडवून जबरदस्तीने ट्रक चालकांच्या ताब्यातील मोबाईल,पैसे,गाड्यांच्या चाव्या,गाड्यांचे कागदपत्र काढून घेतले.मनीशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सातपूर पोलीसांत तक्रार दिली.अंबड लिंक रोड येथे चारुदत्त त्रंबक भिंगारकर, मयूर दिवटे व अशोक सोनवणे यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.