भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील एका विवाहित महिलेचे नाव त्यांच्या एका शेजारी पुरुषाशी जोडून त्यांचे फोटो अप्रमाणिकपणे वापरून गैरउद्देशाने फेसबुकवर एका नावाने बनावट अकाउंट तयार करून विवाहित महिलेचा मोबाईल क्रमांक व त्यांच्या शेजाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकून इंग्रजीमध्ये कोई फ्री होगा तो कॉल करो असे लिहून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कुणीतरी अज्ञात वापरकर्त्याने स्टोरी ठेवल्याची घटना दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली.