आज मंगळवार दोन सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी एमआयएम पक्षाचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला आहे, यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे हे सुद्धा यांच्यासोबत होते अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.