बीडच्या धोंडराई परिसरात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल. गोदावरीपट्ट्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेताना त्या बैलगाडीतून शेतात पोहोचल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात आम्ही कोणतेही सरकार निकष लावणार नाही पण याचे रेकॉर्ड ठेवावे लागते असे मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले