ग्रामपंचायत कार्यालयात कार्यान्वित सीसीटीव्ही चोरीला गेल्याचा प्रकार जिंतूर तालुक्यातील वझर बु, येथे घडला. याप्रकरणी ग्रामसेवकांनी सोमवार दि 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता बामणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वझर (बु) येथे ग्रामसेवक विश्वनाथ तुकाराम भराडे हे सोमवारी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये काम करण्यासाठी आले. यावेळी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्याने काढून नेल्याचे दिसून आले.