वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड, कर्मवीर वॉर्ड, राजीव गांधी वॉर्ड, मालवीय वॉर्ड आणि आजाद वॉर्ड या परिसरांमध्ये गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून शासकीय (महसूल) जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी आज दि.१ आगस्ट ला १२ वाजता शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शिष्टमंडळाने तहसीलदार वरोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.