अकाेला शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मंगळवारी काढलेल्या मिरवणुकीत टिळक रोड परिसरातील कापड बाजार चौकात औरंगजेबच्या फोटोला दूग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अकाेल्यातील युवक "तानाजी" चित्रपटातील औरंगजेबच्या भूमिकेतील पाेस्टरला दुग्धाभिषेक करत असल्याचे दिसत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, दुसरा आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला असून, यात काही युवक औरंगजेबच्या फोटोसह मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. हरिहर पेठ येथील आहे.