बस स्थानक येथून ५७ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान उघडकीस आली.या प्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून हरवल्याची नोंद केली आहे. शेगाव येथील ज्ञानदेव नुराजी सहस्त्रबुध्दे वय ५७ वर्ष हे बस स्थानक येथून बेपत्ता ते उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही. यामुळे नातेवाईकांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी तक्रारीवरून हरवल्याची नोंद केली.