मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ‘आर या पार’ आंदोलनाला इचलकरंजी शहरातील मराठा बांधवांनी भरघोस पाठिंबा दर्शविला. आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ येथील अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत शहरातील शेकडो मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत,जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवला.'आरक्षण आमच्या हक्काचं','जय जिजाऊ, जय शिवराय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.