वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापुर(बाई) येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर कारवाई करीत ६ लाख ५४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली . पोलिसांना शेकापुर बाई येथे अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन ट्रक्टर क्रमांक एम एच 32 बिजी 1286 ची पाहणी केली असता यात अवैध वाळू साठा भरपूर आढळून आला यावेळी पोलिसांनी ट्रक्टर, ट्रॉली आणि वाळू असा एकुण ६ लाख ५४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.