अनसिंग येथील स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये झालेल्या पावसाच्या चुकीच्या व बोगस नोंदींमुळे हजारो शेतकर्यांचं नुकसान झाले असून, पंचनामे व नुकसान भरपाईपासून त्यांना अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकराची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी समाजसेवक यश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी एका निवेदनाद्वो केली आहे.