जैन मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मंदिरातील चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती, पूजेची भांडी असा एकूण 2 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शरणपूर येथे घडली.मनीष जीवनलाल मोदी यांच्या फिर्यादीनुसार सुमती सोसायटीत कुंथूनाथ जैन मंदिर आहे. अज्ञात चोरट्याने या मंदिरात गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटीतील रोकड व साहित्य चोरून नेले.