लातूर शहरात आज गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील राम गल्ली, खडहनुमान, आझाद चौक, गांधी चौक या रस्त्यांवर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली असून उत्साह, आनंद आणि भक्तीची एक अनोखी मेजवानी पाहायला मिळत आहे. पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.