मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील हॉटेल यादगार जवळ प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनासह दोघांना ताब्यात घेत तब्बल १५ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ११ सप्टेंबर रोजी केली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता बसावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी तुषार गजानन लोहटे व विनोद सागर घुगे विरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.