हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने बिडकर कॉलेज मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या मेळाव्याचे उदघाटन आ: कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार कुणावार म्हणाले की बदलत्या काळात रोजगार व नौकऱ्यांची सर्वांना गरज आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना अमलात आणून रोजगाराची संधी उपलब्ध दिली आहे.