गणेश उत्सवानिमित्त आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी १२ वाजता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे भेट दिली. यावेळी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.