महाराष्ट्रात विचारांची लढाई होती आहे आणि राहणार, अडीच वर्षापासून आपण समाजाला फुले शाहू आंबेडकरांचे तत्व सांगत राहिलो हा महाराष्ट्र ओबीसीचा दीनदलिताचा आदिवासी बांधवांचा बारा बलुतेदारांचा भटक्या विमुक्तांचा आहे आम्ही होळकरांची अवलाद आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर आहेत. असे विधान गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे ओबीसी बांधवांना संबंधित करताना लक्ष्मण हाके यांनी संबोधित केले.