मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र आंदोलकांना सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला.खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर महाराष्ट्रभरातून मदतीचे हात पुढे आले. वेगवेगळ्या ठिकाणहुन त्यांना खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत.बदलापूर मधून देखील सकल मराठा समाजाच्या वतीने तीनशे किलोमीटर आझाद मैदानाकडे रवाना केले आहे.