फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव बस स्थानकावर राजू रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत एक 79 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडले आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कणसे करीत आहे.