जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे बांधकाम सुरु असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.