सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झाले आहे. शिव ठाकरे स्वतः या आनंदात सहभागी झाला, त्याने कंबरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे. शिवच्या घरच्या गणरायाच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतले आहे..