दिनांक 30 सप्टेंबर रोजी रात्री 1च्या दरम्यान लहराळा, येथे, फिर्यादीचे घरात अज्ञात चोरटयाने प्रवेश करून कपाटातील सोन्याचे गंठण व मणी 15 ग्रॅम अंदाजे किंमत 32,000/- रूपये व शामसुंदर बादवाड यांचे घरातील चार ग्रामचे सोन्याचे दोन पान अंदाजे किंमत 15,000/-रूपये असा एकूण 47,000/-रूपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला फिर्यादी विठ्ठल दत्ता बादवाड, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती रा.लहराळा ता.लोहा,यांनी दिलेल्या फिर्यादवरुन माळाकोळी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल