दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान जिल्हा पोलिस दल यांच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे व अप्पर पोलिस अधिक्षीका लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी जय बजरंग गणेश मंडळ पोहा येथे नाद डिजे चा पथनाट्य सादर करुन डिजेमुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषण याविषयी जनजागृती केली. सदर पथनाट्य पाहण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिस विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.