मोर्शी शहरातील जयस्तंभ चौक गांधी मार्केटमध्ये दुकाने फोडून मुद्देमान लंपास केल्याची घटना दिनांक दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. मोर्शी पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करून पाळा येथून सागर मनीष परतेती व अमर सुगन इरपाचे नावाच्या आरोपीला अटक करून, दिनांक 4 सप्टेंबरला दुपारी एक वाजता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ठाणेदार राहुल आठवले यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे