राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या मार्गाने आपली भूमिका सरकार समोर मांडली आहे. दरम्यान पोळ्याच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी नवीन घोषणा केली होती. यंदाचा पोळा हा संघर्षाचा आणि कर्जमुक्तीचा पोळा आहे. या पोळ्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्याला बळ देण्यासाठी बैलांवर “सातबारा कोरा-कोरा”, शेतकरी कर्जमाफी हवीच, हे घोषवाक्य लिहण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्यानुसार शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता साक्री