इचलकरंजी शहरात शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी निमित्त विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांनी शहरात भक्तिभाव आणि सांस्कृतिक वैभवाचे अनोखे वातावरण निर्माण केले.या उत्सवाला आमदार राहुल आवाडे यांनी खास उपस्थिती लावून मिरवणुकीचे दर्शन घेतले आणि गणेशभक्तांशी संवाद साधला.शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा गजर,पारंपरिक वेशभूषा,सजवलेले रथ आणि विविध संस्कृतिक झांजांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.