तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा डोंगरी बुजुर्ग येथे दि. 22 ऑगस्ट शुक्रवारला सायं.7 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी दारू विक्रेता दुर्गेश प्रल्हाद काळसर्पे याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 6 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 600 शे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपी दारू विक्रेता विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.