जाकीर कॉलनी येथे वीज चोरी प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4:28 मिनिटांनी बडनेरा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली याबाबत पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हकीकत अशा प्रकारे आहे की फिर्यादी संदिप रामभाऊ कायंदे कार्यकारी अभियंता हे भरारी पथक अकोला त्यांचे पथका सह जाकीर कॉलनी येथे विज मिटर चेकींग करत असता सदर आरोपी याने त्याचे विज मिटर मध्ये छेडछाड करुन विज वितरण कंपनीचे ५६२० युनिट विज किंमत १ लाख ८३ हजार ५०० रुपये. ची चोरी केली.याबाबत फिर्यादी यांनी बडनेरा पोलीसात तक्रार...