अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने सावेडी उपनगर भागातील कचरा संकलन करून हा कचरा प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी असलेल्या कचरा डेपो मध्ये एकत्रित केला जातो त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधीचा त्रास वाढला आहे दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लवकरात लवकर हा कचरा डेपो हलवण्याची मागणी चौकात प्रोफेसर चौकातील नागरिकांच्या वतीने होत आहे याप्रकरणी प्रणव भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले