जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला 'जिल्हा शिक्षक पुरस्कार' आजशिक्षक दिनानिमित्त १५ शिक्षकांना प्रदान करण्यात आला. शेठ ला.ना. विद्यालयातील गांधी सभागृहात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.