महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 2025 ला जनसुरक्षा कायदा पारीत केलेला आहे. या कायद्यातील तरतूदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता दरम्यान भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आला. सदर आंदोलनाला विश्रामगृह भंडारा येथून सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.