लातूर -जिल्हाभरात डीजेमुक्त गणेश विसर्जन जिल्हा प्रशासनाने डॉल्बी वाजविण्यास बंदी घातली. तरीही लातूर तालुक्यातील मुरुडमध्ये अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट करीत पोलिसांच्या आवाहनाला फाटा देत, विसर्जन मिरवणुका काढल्या. आता हा डीजे गणेश मंडळांना चांगलाच भारी उद्योग होत आहे. विविध मंडळांच्या ६० कार्यकर्त्यांसह डॉल्बी मालकांवर तर पोलीस ठाण्यासमोर येऊन गोंधळ घालत डॉल्बी सोडून घेऊन जाणाऱ्या १७ अशा एकूण ७७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.