नागपूर ते मुंबई निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून मंडल यात्रा 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी वसमत शहरात आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले स्वागत .छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ओबीसी नेते राजुरकर यांनी मार्गदर्शन केले यानंतर ही मंडल यात्रा नांदेडच्या दिशेने रवाना झाली .याप्रसंगी तालुक्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते