आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पोळ्याच्या सणाच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील धारणीजवळ कढाव फाट्यावर एक भीषण अपघात बातमी समोर आली आहे. इंदूरहून अमरावतीकडे जाणारी एक चारचाकी गाडी आणि एका दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार २२ वर्षीय मुकेश भिलावेकर आणि ७ वर्षीय अनुष्का धांडे यांचा मृत्यू झाला आहे, तर कीर्ती नावाची एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.कीर्ती नावाची एक व्यक्ती गंभीर जखमी यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.