आज ३० ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आस्थापना विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत श्रीकांत माणिकराव तायडे यांना मानवविज्ञान विद्याशाखेतील मराठी विषयात आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ‘अवधुत डोंगरे यांच्या कादंबरी साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. श्रीकांत तायडे यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून....