दिग्रस तालुक्यातील वाईलिंगी येथे रस्त्याचे सांडपाणी अडविण्यासाठी रपटा टाकल्याच्या कारणावरून विठ्ठल रामधन सगणे (वय ७८) यांना तिघांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यात वृद्ध जखमी झाले. ही घटना दि. ३० ऑगस्ट रोजी घडली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजताच्या दरम्यान दिग्रस पोलिसांनी रंगराव बळीराम सगणे, अनिल रंगराव सगणे व अन्य एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.