वटसावित्री पौर्णिमा निमित्त उपनगर परिसरात गस्त घालत असताना गांधीनगर गेट येथे प्राणघातक अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने एकाला अटक केली आहे.उपनगर भागातील गांधीनगर गेट येथे एक इसम प्राणघातक हत्यार बाळगून काहीतरी उद्देशाने वावरत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना मिळाली.पोलिसांची चाहूल लागताच सतीश विष्णू खेतरे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.