बीडच्या नारायणगडावर गतवर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेतला होता या दसरा मेळाव्यामध्ये लाखो समाज बांधव सहभागी झाले होते यावर्षीही दसरा मेळाव्याची घोषणा मनोज जरांगे यांनी नारायण गडावरून केली आहे यावर्षीचा दसरा मेळावा हा विजयी दसरा मेळावा असणार असल्याची माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी बारा वाजता हा दसरा मेळावा होणार असून या दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित असणारा आहेत.