शांतीनिकेतन परिसरात राहणारे एक वृद्ध दांपत्य पुण्यात मुलाकडे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी २० ऑगस्ट रोजी समोर आली. याबाबत गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.