मोहाडी तालुक्यातील करडी येथे दि. 31 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी 4 वाजता च्या सुमारास भंडारा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोमांस विक्री करणारा आरोपी अजित हसन पठाण रा. गांधी वार्ड करडी याला गोमांस विक्री करताना ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 45 किलो गोमांस असा एकूण 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.