पाचोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहटार जवळील गलाटी नदीच्या पुराच्या पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आढळून आला. अतिवृष्टीचा वन्यजीवांनाही फटका बसला असून जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील लोहटार गावाजवळ नाचनखेडा शेत शिवारातून वाहणाऱ्या गलाटी नदीमध्ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे गलाठी नदीच्या पुरात बुडून या बिबट्याचा मृत्यू झाला असावा.