पोळ्यानिमित्य बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील शेतकरी गणेश महल्ले यांनी सरकारला अनोख्या पद्धतीने मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी कर्जमाफी करण्याचे सांगितले होते मात्र अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. तरी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि महिलांना एकविसशे रुपये जाहीर केले ते पण द्यावे अशी विनंती पोळ्या निमित्य शेतकऱ्याने केली आहे.