पालघर शहरातील पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या नवले फाटक परिसरातील भुयारी मार्गातून तरुणाची स्कूटर वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. भुयारी मार्गातून जात असताना त्या ठिकाणी पाणी साचल्याने अचानक तरुण स्कूटरसह पाण्यात अडकला प्रवाह जास्त असल्याने स्कूटर नाल्यात वाहून गेली. तरुणाने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. स्थानिकांनी मदत करत क्रेनच्या सहाय्याने नाल्यात वाहून गेलेली तरुणाची स्कूटर नाल्यातून बाहेर काढली. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.