जिंतूर येथील मराठा सेवक तथा मुंबईतील उद्दोजक गणेशभाऊ काजळे यांच्यावतीने मराठ्यांच्या लढ्यासाठी सेक्टर 5 उत्सव चौकच्या बाजूला खारघर नवी मुंबईत येथे येणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवढे दिवस आंदोलन सुरू राहील तोपर्यंत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील मोठे संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गणेश भाऊ काजळे यांच्या वतीने देण्यात आली.