मेहकर शहरातील महानुभाविय श्रीकृष्ण मंदिर संस्थांन येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता महानुभाव पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव सोहळा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.व तसेच महानुभव पंथ नगर परिषदेच्या खुल्या जागेत २५ लाख रुपये किंमतीच्या सभामंडप बांधकाम व सौदरीकरण कामाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.