शालेय विद्यार्थ्यांमध्ये साखरयुक्त पेय आणि पदार्थांच्या अतिसेवनामुळे वाढत असलेल्या आरोग्य समस्यांची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेने 'नो शुगर' नावाचा एक अभिनव उपक्रम सोमवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष फलक लावण्यात येत आहेत.