अंजनगाव सुर्जी सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीत व चिखलदरा तालुक्यात येत असलेल्या गरजदरी तलावात काल रविवार रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजताच्या सुमारास बुडून सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मोहम्मद रिजवान मोहम्मद किस्मत रा.पथ्रोट असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा तलावाजवळ हातपाय धुण्याकरिता गेला असता त्याचा अचानक पाय घसरला व तो तलावात पडला व त्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सदर माहिती पोलीस स्टेशन अंजनगाव व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना देण्यात आली.