आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना, रेड रेबन क्लब व प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राज योगिनी दादी प्रकाश मनी जी यांच्या अठराव्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी पाटील, प्राचार्य माई, प्रोफेसर डॉ निंबाळकर यांनी रक्तदानाचे महत्त्व समजून सांगितले.