आष्टा गावात वडगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. खोत-माने मळ्याजवळ शुक्रवार, दि. २२ रोजी रात्री हा अपघात झाला. हरिष सुरेश शेटे (वय २७, रा. बागणी, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास हरिष शेटे हा दुचाकीवरून (एमएच १० ईएम १९४०) बागणीहून आष्ट्याला मित्रांकडे जेवणासाठी निघाला होता. यावेळी समोरून संदेश नेताजी कदम (वय २३,