गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे नागरिक तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबररोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.